
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025। फलटण । मलठण येथील शनी मारुती मंदिर (पादारवेस) येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने शनिवार (दि. 12) रोजी पहाटे 4 ते 5 अभिषेक, 5 ते 6:20 सदगुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन, सकाळी 6:20 वाजता जन्मकाळानिमित्त फुले वाहणे त्यानंतर महाआरती व सुंठवडा वाटप होणार आहे.
दुपारी 4 ते 6 सदगुरू हरिबाबा महाराज महिला भजनी मंडळाचे भजन, रात्री 9 ते 11 श्री स्वामी समर्थ महाराज भजनी मंडळाचे एकतारी भजन होणार आहे. रविवार दि. 13 एप्रिल सायंकाळी 5 ते 7, सदगुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ व संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ मलठण यांचे भजन, सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.