दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांच्या अडीचशे व्या जयंतीनिमित्त कोलकत्ता येथील राजा राम मोहन रॉय ग्रंथालय यांच्या अर्थसाहयातून राष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार 22 सप्टेंबर रोजी साताऱ्यात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिकारी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी आठ वाजता सातारा शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मध्यवर्ती सहकारी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालय पोवई नाका बीएसएनएल मुख्यालय मार्गे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये सातारा शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते होत असून यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहेत याशिवाय महिला सक्षमीकरण व वाचन संस्कृती क्षेत्राशी संबंधित घोषवाक्यांचे विविध फलक या दिंडीमध्ये समाविष्ट असताना आहे.
रॅलीची सांगता झाल्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय समोरील अजिंक्य सांस्कृतिक भवन येथे गुरूवारी अजिंक्य कॉलनी सदर बाजाराचे सकाळी दहा वाजता राजाराम मोहन रॉय यांचे महिला सक्षमीकरणातील योगदान व सद्यस्थिती या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक निरंजन फरांदे असून जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आहेत.
थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांनी स्त्री विषयक केलेल्या कार्याचे स्मरण आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व याची शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या करता हे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असे अमित सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.