सद्गुरू श्री शांतीदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 20 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शांतीदास नगर (गोखळी) येथे श्रीदत्त जयंती व सद्गुरू शांतीदास महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित वार्षिक यात्रेस निमित्त दि. १९ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असुन यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने अखंड हरिनाम सप्ताह, भव्य खुली भजन स्पर्धा, देशी गोवंश खिलार वळू प्रदर्शन व जनावरांचा भव्य बाजार, कुस्त्यांचे भव्य मैदान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत; अशी माहिती संयोजकांनी दिली.

शनिवार दि २३ रोजी भव्य खुला गट भजन स्पर्धा सकाळी १० ते सायं ५ या वेळेत संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी स्व. ह. भ. प. सोपानराव गेनबा गावडे यांचे स्मरणार्थ उध्दव सोपानराव गावडे यांचे कडून ११ हजार १११ रुपये, व्दितीय क्रमांक डॉ. अमोल आटोळे यांचे वतीने ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांक साठी अनिल काशिनाथ फडतरे व दादासो पांडुरंग कदम यांच्या वतीने ५ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे ठिकाण शांतीदास नगर (गोखळी) असून नाव नोंदणी सदाशिव खटके (मोबाईल नंबर 7020296193) या नंबरवर करावी.

तसेच मंगळवार दि. १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत जनावरांचा भव्य बाजार खरेदी, विक्री व सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ पासून देशी गोवंश खिलार वळू प्रदर्शन व जनावरांच्या खरेदी विक्रीचा भव्य बाजार तसेच बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!