महाशिवरात्रीनिमित्त विडणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२५ | विडणी | विडणी येथील पुरातन असलेल्या उतरेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. २५ पासून सलग ३ दिवस सकाळी ७ ते ९:३० वाजेपर्यंत शिवलीलाअमृत पारायण, सायं. ९ ते १२ आळंदी येथील कीर्तनकार स्वरभास्कर ह.भ.प. अनिकेत महाराज बांगर यांचे कीर्तन होणार आहे.

महाशिवरात्री दिनी बुधवार दि.२६ रोजी दुपारी परिसरातील भजनी मंडळाकडून भजन, रात्री ९  वा. शिवचरित्र व्याख्याते किर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज भांदिर्गे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री लघु रुद्र अभिषेक व बेल वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ९ वा. शिवलीला वअमृत पारायणाची सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!