फलटण येथील वखार महामंडळाच्या केंद्रामध्ये विविध सुविधा उपलब्ध; साठा अधीक्षक ज्ञा. सो. जाधव यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण वखार केंद्र हे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत साठवणुकीच्या सुविधा देत आहे. फलटण वखार केंद्राची साठवणूक क्षमता 8920 मे. टन. असुन, साठवणूक क्षमतेच्या 25% रिकामी जागा शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक करण्यासाठी आरक्षित केली आहे. येथे शेतकऱ्यांना 7/12 वरील पिकपाणी नोंदी नुसार साठवणूक केलेल्या मालाच्या वखार भाड्यात 50% सवलत दिली जाते. वखार केंद्रावर शेतीमालाची (तृणधान्य, गळीतधान्य, कडधान्य ई.) प्रतवारी व स्वच्छता करण्यासाठी Cleaning & Grading Machine उपलब्ध असुन मशीनचे प्रती क्विंटल चाळीस दर आहे. गोदामात साठवणूक करण्यासाठी शेतीमाल व प्रक्रिया उद्योग साठा साठवणूक करण्यात येतो, त्यास सोबत दिलेल्या तक्त्या नुसार फलटण वखार केंद्रावरील साठवणूक दर प्रती पोते प्रती महिना पुढील कालावधी पर्यंत निश्चित केलेले आहे. साठवणुकीस असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालावर ऑनलाईन तारण कर्ज योजने अंतर्गत बाजार मूल्याच्या 70% तारण कर्ज 9% व्याज दराने वखार केंद्रावरच तारण कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वखार कार्यालयात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबडतोब कर्ज रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. वखार केंद्रावर वखार पावतीवर साठवणूक करण्यात आलेल्या प्रत्तेक मालास विमा संरक्षण मिळते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे फलटण येथील साठा अधीक्षक ज्ञा. सो. जाधव यांनी दिली.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ फलटण वखार केंद्र हे अत्यावश्यक सेवेत कार्य करत आहे. मालाची शाश्रशुद्ध साठवणूक, मालाची निगा राखणे, आवक-जावक तत्पर सेवा देण्यासाठी नेहमी सज्ज असते. शेतकरी बांधव, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी उत्पादक बचत गटांना आपला बहुमूल्य किमतीचे धान्य सुगीच्या काळात पारंपारिक पद्धतीने विक्री करताना शेतातून तयार धान्य उपलब्ध असलेल्या पोत्यांमध्ये वजन न करता, स्वच्छता, प्रतवारी न करता, न वाळवता घेऊन गेल्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली असूनही व बाजारात त्याच पिकाच्या धान्याची आवक अधिक असल्याने मालाची किंमत बाजारभावाच्या खूप कमी किमतीत विक्री करावा लागतो. किंवा दर कमी असूनही नाईलाजाने धान्य कवडीमोल किमतीत विकावा लागल्याने नुकसान होते.

पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी खूप मेहनतीचे व आर्थिक दृष्टीने भांडवल गुंतवणूक केलेली असते. त्याचे मोल खूप मोठे आहे. काढणी नंतर त्यापिकाची विक्री करून अधिक नफा मिळवणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे पिकाची वाढ पूर्ण होई पर्यंत जसे पिकव्यवस्थापन केले त्याप्रमाणेच त्या पिकाची विक्री व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना 1957 साली झाली असुन सुगीच्या काळात कमी किमतीत धान्य विक्री करून भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी धान्य काढणी केल्यानंतर उन्हात चांगले वाळउन, स्वच्छ तागाच्या बारदाण्यात भरून फलटण वखार केंद्रावरील क्लिनिंग व ग्रेडिंग मशीन मध्ये धान्य स्वच्छ व प्रतवारी करून 50 किलो वजन करून शिलाई करून धान्य साठवणूक करण्यात यावे, असेही यावेळी जाधव यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यास 70% कर्ज 9% व्याजदरात घेऊन पैशाची तात्पुरती गरज भागउ शकतात. गोदामातील साठवणूक केलेल्या आपल्या मालाची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी प्रयत्न करून बाजारभावाच्या दरात विक्री करून अधिक नफा घेऊन आपला आर्थिक प्रगती साधू शकाल. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट मार्फत साठवणूक केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री करून अधिक नफा कमाऊ शकाल. शेतकरी बांधवानी आपला बहुमुल्य किमतीचा माल/साठा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ फलटण वखार केंद्रातील गोदामात साठवणूक करून सुविधेचा लाभ घ्यावा. वखार केंद्रावर गोदाम Lock & Key, गोदामाच्या जागेचे आरक्षण तसेच वखार पावतीवरील साठ्याचे पर्याय सुविधा उपलब्ध आहेत, असेही यावेळी जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!