दैनिक स्थैर्य | दि. 06 जानेवारी 2023 | फलटण | फलटण तालुक्यातील सांगवी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा सर्व ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे येथे सत्कार करण्यात आला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक डॉ. यु. डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या अंकिता कुंभारकर, पूजा चौधर, ऋतुजा भामे, अनुजा भिसे, प्रणिता आगवणे, तनुजा शिंगाडे, यांनी सांगवी येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषी कन्या शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.
यावेळी सांगवी गावच्या सरपंच श्री. संतोष लव्हा मोरे, उपसरपंच सौ. शर्मिला सुरेश जगताप,कृषी सहाय्यक तान्हाजी काशिद, व ग्रामस्थ उपस्थित होते.