स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामधील सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे वडले या गावात आढळून आले आहेत. म्हणजेच फलटण तालुक्यातील वडले हे गाव करोनाचे हॉटस्पॉट बनत चालेले असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. दिवसेंदिवस करोना रुग्ण वाढत असलेने वडले गाव सील केलेले आहे. संपूर्ण गावासाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत औषधे, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांचेसाठी एकूण 12 पीपीई किट्स, गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड 25 लिटर, 650 बॉटल हँड सॅनिटायझर, ५ लिटरचे १० सॅनिटायझरचे कॅन, 1300 वॉशेबल मास्क, 30 कुटुंबियांना तांदूळ, गहू आणि भाजीपाला याचा समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे किट, ग्रामपंचायत सदस्यांच्या वर्गणीतून सर्व कुटूंबियांना करोना प्रतिबंधात्मक आर्सेनिक अल्बम 30 होमियोपॅथीक गोळया या सर्व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांचे हस्ते करणेत आले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, सरपंच अनुराधा सोनवलकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य पोपटराव सोनवलकर, छाया शेंडगे, दत्तात्रय लाळगे, पोपट मोरे, वडले वि.का.स सोसोयटी सचिव विठ्ठल शेंडगे, बाबुराव सोनवलकर, भाडळी बुद्रुकचे मोहनराव डांगे, ग्रामसेविका उज्वला गार्डी, आरोग्य सेविका फुले, रमेश ठोंबरे, भिमराव भोसले, सतिश भोसले, सागर सोनवलकर, लक्ष्मण शेंडगे, रविंद्र कुचेकर, रामचंद्र कुचेकर व बाळू कुचेकर यांच्यासह वडले ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्ग चे पार्श्वभूमीवर महामारीच्या विरोधात लढा देणेकरिता श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्वतः आणि सचिव शंकरराव सोनवलकर यांचे समवेत वडले गावाला भेट दिली. ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढविले, स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबत बहुमोल असे मार्गदर्शन आणि सूचना तसेच संपूर्ण गावाला सर्वतोपरी मदत करणेचे आश्वासन दिले. वडले गावाने मागीतलेली सर्व मदत ग्रामपंचायतीस सुपूर्द केली.यास्तव सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोपटराव सोनवलकर यांनी श्रीमंत रघुनाथराजे यांचे आणि मार्केट कमिटी संचालक मंडळ आणि सचिव यांचे विशेष आभार मानले.