दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड अंतर्गत कृषिकन्या कु.मंजुषा विलास बाबर यांनी चौरवाडी (ता.फलटण) येथे कृषी विषयक विविध उपक्रम राबविले.
सदर उपक्रमांतर्गत बीज प्रक्रिया, चारा प्रक्रिया, निंबोळी अर्क, विविध चर्चासत्रे, खत व्यवस्थापन, पिकांवरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन वगैरे प्रात्यक्षिके कृषीकन्या कु.मंजुषा बाबर यांनी ग्रामस्थ व शेतकर्यांना करुन दाखविली. यावेळी किरण फाळके, चंद्रकांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी कु.मंजुषा बाबर यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, प्रा.एन.एस.ढालपे, प्रा.व्ही.पी.गायकवाड, प्रा.एस.वाय.लाळगे, प्रा.ए.एस.नगरे, प्रा.जी.एस.शिंदे, प्रा.एन.ए.यादव, प्रा.ए.एस.आडत यांचे मार्गदर्शन लाभले.