दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । बारामती । बारामती औद्योगिक क्षेत्रातील आयएसएमटी कामगार संघटनेच्या वतीने कामगार दिन सर्व कर्मचारी व कुटूंबिया च्या बरोबर विविध उपक्रम सह साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलन व भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कामगार संघटनेच्यावतीने मान्यवरांचा कामगार कायद्याची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. कंपनी आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे योगदान म्हतपूर्ण असून आशा कठीण समयी कुटुंबियाची साथ म्हणजे संजविनी असल्याचे मत कंपनीचे प्लांट हेड किशोर भापकर यांनी सांगितले. कामगार दिनाचे महत्त्व आणि कामगार चळवळीचे योगदान याविषयी संक्षिप्त माहिती जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम यांनी व्यक्त केले.
कामगार चळवळी मधून कामगारांचे नेतृत्व उदयास येते व ते नेतृत्व कामगारांना न्याय ,समता देणारे असेल तर कामगारांना न्याय मिळतो. असे मत कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी गावरान फिल्म प्रस्तुत चांडाळ चौकडी च्या करामती हा कार्यक्रम सादर करण्यात आला . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष कल्याण कदम ,जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे ,उपाध्यक्ष शिवाजी खामगळ ,खजिनदार रवींद्र गिरमकर ,सल्लागार संतोष साळवे, सल्लागार रमेश लोखंडे, सदस्य सुरेश दरेकर ,सदस्य संजय सस्ते ,सदस्य सुनील पोंद्कुले यांनी विशेष प्रयत्न केले.