वर्धन अँग्रो कारखाना स्थळावर मोळीपूजन करताना धैर्यशील कदम,शारदा कूष्णमूर्ती,भीमराव पाटील, विक्रमशील कदम व अन्य
स्थैर्य, औंध, दि. २० : यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या पाठिशी वर्धन अँग्रो साखर कारखाना खंबीरपणे उभा राहणार असून शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केले.
वर्धन अँग्रो कारखान्याच्या कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली,युनियन बँक ऑफ इंडिया च्या क्षेत्र प्रबंधक शारदा मूर्ती याच्या हस्ते व कारखान्याचे संचालक, उसउत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या उपस्थितीत मोळी पूजन करून यशस्वीपणे गळीत हंगाम २०२०-२१ ची सुरवात करण्यात आली.
यावेळी बोलताना धैर्यशील कदम पुढे म्हणाले की वर्धन अँग्रो कारखाना हा कारखानदारी तील वेगळं आदर्श निर्माण करणारा कारखाना असून चालू गळीत हंगाम लवकर सुरू करून जास्तीत जास्त कारखाना चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दर देणार आहोत. गत हंगामाच्या समाप्तीला कोविड च्या जागतिक महामारी मुळे कारखाना अपेक्षित कालावधीच्या १ महिना अगोदर बंद करावा लागला. त्या मुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिल अदा करण्या मध्ये काही अडचणी निर्माण झाल्या परंतु ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, व सर्व संचालक मंडळाने दिलेल्या समर्थ साथीने आणि सगळ्यांच्या विश्वासाने आपण सगळ्यांवर मात करून पुन्हा नव्या दमाने वेळे अगोदर कारखान्याची ऑफ सिझन ची कामे पूर्ण करून कारखाना चालू केलेला आहे.
यावेळी बोलताना शारदा मूर्ती यांनी कारखान्याची प्रशंसा करताना म्हणाल्या की वर्धन कारखाना हा नियोजन बद्ध काम पूर्ण करून लवकर सुरू केला आहे. बँकेच्या माध्यमातून लागेल तिथे सहकार्य करण्याची भूमिका आमची राहील.
कारखान्याचे जेष्ठ संचालक भीमराव पाटील म्हणाले की कारखाना अद्यावत असून आपण सर्वांनी हातात हात घालून धैर्यशील दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूयात लावलेले लहान रोपटे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवण्याचे आवाहन कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक संपतराव माने,हिंदुराव चव्हाण,पृथ्वीराज निकम, संजय माने,दत्तात्रय साळुंखे, सत्वशील कदम, सागर शिवदास, निलेश माने, विभागातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, विकास सेवा सोसायटी चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल, सतीश पिसाळ, सुनील कोकिटकर, चंद्रकांत खराडेयांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत विक्रमशील कदम यांनी केले. प्रास्ताविक रणजित चव्हाण यांनी केले व आभार संचालक भीमराव डांगे यांनी मानले.