दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | बारामती |
पावसाचे पाणी इतरत्र वाहून न जाता जाग्यावरच मुरावे व जमिनीची धूप चांगल्याप्रकारे व्हावी म्हणून महाराष्ट्र शासन वनविभागाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम जराडवाडी (ता. बारामती) येथे बर्हाणपूर येथील बारामती कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने करण्यात करण्यात आले.
याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत गोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वनकर्मचारी दिलीप काळे, शुभम जराड, मच्छिंद्र जराड व कॉलेजचे विद्यार्थी व अधिकारी व उंडवडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसरात पाच बंधारे बांधून पूर्ण केले. त्याचा फायदा परिसरातील शेतीला होणार आहे.