वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम


दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२४ | फलटण |
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा या मोहिमेत सहभाग राहणार आहे. त्यानुसार फलटण येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सुरुवात करण्यात आली.

‘वंचित’चे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. माण, खटाव, कोरेगाव आणि पारगाव खंडाळा या तालुक्यात सुुरुवातीला स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वंचितचे सातारा जिल्हा पूर्व उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, फुले, शाहू, आंबेडकर विद्वत महासभा तालुकाध्यक्ष आनंद निकाळजे, तालुकाध्यक्ष संदीप काकडे, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड, जिल्हा महासचिव अरविंद आढाव हे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.


Back to top button
Don`t copy text!