खराडेवाडीतील बौध्द वस्तीला रस्ता न दिल्यास आंदोलन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२३ | फलटण |
साखरवाडीजवळ असलेल्या खराडेवाडी (ता. फलटण) गावातील बौध्द वस्तीला रस्ता नसल्याने येथील नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे. ही समस्या समजताच ४ जुलै २०३३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट दिली व येत्या ७ दिवसात बौद्ध वस्तीला अधिकृत रस्ता न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नारायण पवार, अमित गायकवाड, सुभाष गायकवाड, सपनाताई भोसले, चित्राताई गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते अक्षय साळवे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!