दैनिक स्थैर्य । दि. १४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । प्रतिवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो ? यादिवसाचा इतिहास काय आहे ? असे अनेक प्रश्न आपल्या मनातनिर्माण होतात. दुर्दैवाने याविषयीच्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर कुठेहीउपलब्ध नाही. विविध संकेतस्थळांवर व्हॅलेंटाईन डेचा इतिहास मिस्ट्री म्हणूनसंबोधला गेला आहे. युरोप मध्ये अजूनही संदिग्धता आहे की, नक्कीकोणत्या व्हॅलेन्टाईन नावाच्या व्यक्तिपासून याला सुरुवात झाली. अर्थातच, जसे 1 जानेवारी या दिवसाला काहीही सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, वैज्ञानिककिंवा आध्यात्मिक कारण नाही, तरीही हा दिवस नवीन वर्ष म्हणूनसाजरा केला जातो, तसेच व्हॅलेंटाईन डेचेही आहे. या दिवशीराष्ट्रद्रोही व्हॅलेंटाईनला त्याच्या राष्ट्रद्रोही कृत्याविषयी फाशी देण्यात आली होती. तिसर्या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री (प्रीस्ट) होता. त्याकाळातील क्लॉडीयस 2 नावाच्या राजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे त्यानेव्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला होता.खरे पाहता व्हॅलेंटाईन डे ख्रिस्तीपंथाशी निगडित आहे.हा दिवस साजरा करून आपण एक प्रकारे एका दिवसाचे वैचारिकधर्मांतर करत असतो. 14 फेब्रुवारीला असणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने ‘व्हॅलेंटाईन डे’चे वास्तव काय आहे ? समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे खरोखरीच साजरा करावा का ?ते या लेखाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
ख्रिस्ती पंथाशी निगडित असलेला ‘व्हॅलेंटाईनडे’ – हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेलेनाही. हिंदु धर्मात मानसिक स्तरावरील प्रेमाच्याही पुढे असलेल्याआध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभावअसल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदुधर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ? व्हॅलेंटाईन डे ख्रिस्तीपंथाशी निगडित आहे. हिंदु धर्मात जे काही सण, उत्सव साजरेकेले जातात, त्यांना आध्यात्मिक आणि शास्त्रीय आधार असतो,उदा. दत्त जयंती, गणेश चतुर्थी, श्रीरामनवमी इत्यादी सणांना असणारे महत्व हेच सांगते.या दिवशी त्या त्यादेवतांचे तत्त्व पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात येत असल्याने सर्वांना त्याचा लाभ होतो.हिंदु धर्मातील संतांच्या पुण्यतिथीला त्या त्या संतांचे तत्त्व सर्वांना मिळते.व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे,फ्रेंडशिप डे, पाश्चात्त्य विचारसरणीचे आहेत.या दिवशी प्रेम,माता, पिता आणि मैत्री यांचे तत्त्व पृथ्वीवर येत नसल्यामुळे त्याचा कुणालाहीलाभ होत नाही; म्हणूनच असे दिवस साजरा करणे म्हणजे सर्वांबरोबरच देशाची आर्थिक, सामाजिक अन् कौटुंबिक हानी करणेआहे.
‘व्हॅलेंटाईन डे’मागील छुपे अर्थकारण – पाश्चात्त्यांनाहीआश्चर्य वाटेल,असे 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत रोझ डे, प्रपोझल डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिसडे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे असे दिवस लागोपाठ भारतातसाजरे केले जातात. एवढे दिवस विदेशातही साजरे केले जात नाहीत. व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मोठ्या प्रमाणावर चॉकलेट, खेळणी, भेटवस्तूंची विक्री होत असते आणि विदेशी आस्थापने त्याचा लाभ उठवतात.भारतात व्हॅलेंटाईन डे च्या काळात आर्चीझ नावाच्या शुभेच्छापत्र बनवणार्याआस्थापनाची शुभेच्छापत्रांची विक्री 10 पटींनी वाढते. याकाळात शुभेच्छापत्र बनवणार्या आस्थापनांचा मोठ्याप्रमाणावर व्यवसाय होतो.त्यामुळे या वस्तू विकत घेऊन आपण विदेशी आस्थापनांना कोट्यवधी रुपये नफा कमवून देतआहोत.यावरून ‘व्हॅलेंटाईन डे’मागील छुपे अर्थकारण लक्षात घेण्यासारखे आणि महत्वाचे वाटते.
युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र – सध्या अधिकाधिकमुले-मुली व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. एका सर्वेक्षणानुसार सुमारे 30टक्क्यांहून अधिक मुले मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक बनवणार्या आस्थापनाच्या मतानुसार इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशीगर्भनिरोधकांची विक्री अधिक होते. अर्थातच, अविवाहितमुले-मुली या दिवशी लैंगिक संबंध ठेवतात हे यातून अधोरेखित होते.या काळातगर्भपाताचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.यावरून सध्या या दिवसालाबीभत्स स्वरूप आल्याचे लक्षात येते. इंटरनॅशनल बिझिनेस टाइम या इ-दैनिकानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुसाईड हेल्पलाईनला सर्वांत जास्त फोन येतात. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत. भारतीय संस्कृतीचे आचरण करूनदेश-विदेशातील अनेक लोक आनंद आणि शांती यांचा अनुभव घेत आहेत; मात्र भारतातील युवा पिढी ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण करण्यात धन्यता मानत असल्याने तीअशांत, दुराचारी आणि एड्सची शिकार होत आहे. आपल्या देशातीलचांगल्या आणि तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे हे एक षड्यंत्रच आहे. आर्थिकहानीसह या देशातील भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी अशा चुकीच्या डे मुळे होत आहे.
व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करा – व्हॅलेंटाईनडे साजरा करण्याऐवजी या दिवसाचा अनेक अल्पवयीन मुलींना मातृत्व देणारा दिवस म्हणूनधिक्कार करा,असे मत प्रख्यात वृत्तवाहिनी बी.बी.सी.ने व्यक्तकेले होते.व्हॅलेंटाईन डे अनेक देशांत साजरा होतो; मात्रभारतात हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्याची नवीन पद्धत रूढ होत आहे,ती अत्यंत प्रशंसनीय आहे,असे मत यावृत्तवाहिनीने व्यक्त केले होते.
जगात आणि त्यातल्या त्यात अमेरिकेतव्हॅलेंटाईन डेच्या सुमारास न्यायालयात दाखल होणार्या घटस्फोटांच्या खटल्यांत 40 टक्के वाढ होत असल्याचे एका खाजगी आस्थापनाने केलेल्या पाहणीत आढळून आलेआहे. या काळात विवाहित स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधात होणार्या घटनांचापरिणाम घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणात होतो, असे दिसून आलेआहे. भारतातील नागरिकांची प्रत्येक बाबतीत पाश्चात्त्य देशांचे अंधानुकरण करण्याचीवाढती प्रवृत्ती लक्षात घेता, अशी परिस्थिती भारतातहीनिर्माण होईल हे भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. या देशातील भारतीय संस्कृतीचीअपरिमित हानी अशा चुकीच्या डे मुळे होत आहे त्यामुळे अशा दिवसांवर बहिष्कार टाकलापाहिजे ! जनतेने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विदेशीआस्थापनांनी टाकलेला हा दरोडा लक्षात घेऊन अशा विकृत दिवसांना कायमचे हद्दपारकरायला हवे.
जगातील अनेक देशांनी हद्दपार केलेला व्हॅलेंटाईन डे- अनेकदेशांनी व्हॅलेंटाईन डेची हकालपट्टी करत आपल्या देशात विविध डे साजरे करण्याचेठरवले आहे, उदा. स्लोव्हेनियात 12मार्चला सेंट ग्रेगरी डे, वेल्स प्रांतात 25 जानेवारीला डॉनवेन डे, ब्राझिलमध्ये 12 जूनला एनामोटड डे साजरा केला जात आहे, तसेच 1969 मध्ये तर रोमन कॅथॉलिक संतांच्या कॅलेंडर्समधून व्हॅलेंटाईन डे काढूनटाकण्यात आला आहे, हे विसरू नका. मलेशियातूनही हा डे हद्दपारकेलेला आहे. अशा विकृत डेची हकालपट्टी तुम्ही करणार कि नाही ? जगातील अनेक देशांनी हद्दपार केलेला हा व्हॅलेंटाईन डे आम्ही भारतियांनीका डोक्यावर घ्यावा ? आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणिसमाजापेक्षा देश जास्त महत्त्वाचा आहे. हाच दृष्टीकोन ठेवून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्या अनेक विरांनी आपले सर्वस्व अर्पण केले आणित्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा संदेश मानून तेलग्न करून बसले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असतेका ? याचा आज विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करुयात – व्हॅलेंटाईनडे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपणहिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुखआपल्याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्या सुखाच्याहीपुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदु धर्माच्या शिकवणीत आहे; म्हणूनच व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचेयोग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करायला हवे. आपल्या बरोबर इतरांनाही या विषयी जागृतकरणे गरजेचे वाटते.
आपल्या देशातील चांगल्या आणि युवा पिढीलाचुकीच्या मार्गावर नेण्याचे हे एक षड्यंत्रच आहे, व्हॅलेंटाईनडे च्या पाश्चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावेयासाठी या डे च्या विरोधात युद्धपातळीवरून प्रचार, प्रसारकरण्याची आज आवश्यकता आहे. प्रेमाची जादू खरोखरचअनुभवायची असेल,तर आपले क्रांतीकारक, परमवीरचक्रधारीसैनिक, अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे आमचे तरुण पोलीस,कमांडो यांच्याकडून प्रेम कसे करावे, याचे धडे घेतले पाहिजेत यातूनच व्हॅलेंटाईन डेला आपल्या भारतातून कायमचेहद्दपार करण्याची प्रेरणा मिळेल. हीच आज काळाची आवश्यकता आहे.
संकलक : श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
संपर्क क्र.: ९७६२७२१३०४