पालच्या खंडोबाला सोमवारपासून वज्रलेप

भाविकांना दर्शनासाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मंदिर बंद


स्थैर्य, सातारा, दि. 8 नोव्हेंबर : पाल येथील श्री खंडोबा मंदिरातील स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. 10) 16 नोव्हेंबरअखेर श्री खंडोबा मंदिर भाविक व ग्रामस्थांनादर्शनासाठीबंद राहील. या कालावधीत सर्व धार्मिक विधीही बंद राहणार असून, त्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवराज पाटील, उपाध्यक्ष उत्तमराव गोरे व संचालकांनी केले आहे.
श्री खंडोबा मंदिरात सलग आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यातसोमवारी (ता. 10) कालहरण, तर मंगळवारपासून (ता. 11) शुक्रवारपर्यंत वज्रलेप विधी पूर्ण केला जाईल. 15 व 16 नोव्हेंबरला पुन्हा प्रतिष्ठापना, होम हवन विधी करण्यात येईल. 17नोव्हेंबरपासून श्री खंडोबा मंदिर भाविक भक्तांना व ग्रामस्थांना दर्शनासाठीखुले होईल.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत – म्हणून पाल येथील श्री खंडोबा ओळखले – जाते. श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगावर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने वज्रलेप करण्यात येणार असल्याचे मार्तंडदेवस्थान ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. या कालावधीत खंडोबा मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे, वज्रलेप च्या कामात कोणताही अडथळा न आणता गावकर्‍यांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, हे कार्य पारंपरिक रीतिरिवाज, धर्मशास्त्र व विधीनुसार पार पाडले जाईल. कामादरम्यान मंदिरातील सर्व पूजाविधी तात्पुरते थांबविण्यात येणार आहेत.17 नोव्हेंबरला श्री खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर पुन्हा सर्व भक्तांसाठी नियमित पूजाविधी, आरती आणि दर्शन व्यवस्था सुरू राहील, असे देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!