स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त वाईत योग शिबिर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । वाई । आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त वाई मंगळवार (दि २१ जून) सकाळी साडेसहा वाजता शहरातील सर्व शासकीय कार्यालये,पोलीस ,नगरपालिका प्रशासन,सार्वजनिक संस्था,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, काही निवडक शाळा व शहरातील नागरिक,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत एकत्रित भव्य योग शिबिर कृष्णा नदी तीरावरील दोन्ही बाजूस महागणपती मंदिर परिसरात कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशनच्या वतीने आयोजित केले आहे.

सार्वजनिक तसेच नदी स्वच्छता मुळे जसे निसर्गाचे व सामाजिक स्वास्थ्य जपले जाते त्याच प्रकारे योगा मुळे मानवी स्वास्थ्य निरोगी राहते,याचा मिलाप देऊन सार्वजनिक स्वच्छता व योगा मुळे आरोग्य जपण्यासाठी व याचा सततच्या जीवनात प्रसार व कार्यवाही व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे फौंडेशनचे सचिव श्री काशिनाथ शेलार यांनी सांगितले.

या एकत्रित शिबिराचे नियोजन आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग समिती,योग विध्या धाम,विवेकानंद योग केंद्र,वाई नगरपालिका वअखिल भारतीय योग शिक्षक महासंघ,दिशा अकॅडमी,रोटरी क्लब वाई इत्यादी संस्था यांच्या सहकार्याने होत आहे. मानवतेसाठी योग हे यावर्षीचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सर्वांनी अंगीकृत करण्यासाठी सर्व नागरिकांनी या योग शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष नितिन कदम यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!