स्थैर्य, फलटण : कोरोना महमारीच्या कालखंडामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नव नवीन धोरणे अवलंबून शैक्षणिक क्षेत्रात विशेष नावीन्य आणणाऱ्या आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. वैशाली शिंदे यांना इंडिया रेकॉर्ड या भारतातील विशेष प्राविण्य असणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सौ. वैशाली शिंदे यांनी महाराष्ट्रात प्रथमच लहान मुलांसाठी व्हर्च्युअल क्लासेसचा अभूतपूर्व प्रयोग सुरू केला व त्यानंतर कित्येक महिन्यांनी तो प्रयोग महाराष्ट्र राज्य शासनाने देखील अवलंबला होता.
सौ. शिंदे अध्यक्ष असणाऱ्या व्ही. एस. फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्यासाठी नृत्य, वक्तृत्व, गायन तसेच वादन अशा स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आयडियल स्कूलच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉम्पुटर क्लासेस, डान्स क्लासेस, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण वर्ग अशा तऱ्हेच्या नाविन्यपूर्ण अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून शैक्षणिक क्षेत्रात प्रबोधनात्मक उत्क्रांतीचा सफल प्रयत्न सौ.वैशाली शिंदे व त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून झाला. याबद्दल महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.