
स्थैर्य, वडुज, दि.२५: वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनील गोडसे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. गत काही दिवसांपूर्वी सुनील गोडसे यांना अशक्तपणा व कणकणीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी दवाखान्यामध्ये आपली कोरोना टेस्ट करून घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलेले आहे.
सुनील गोडसे यांची प्रकृती उत्तम असून 14 दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी गृह विलगीकरण करून कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन गोडसे यांनी केलेले आहे.