कोळकीच्या हॉटेल जीतमध्ये वडल्याच्या युवकाची आत्महत्या


दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । फलटणचे उपनगर सनजले जाणार्या कोळकी येथील हॉटेल जीतच्या रूम नं. २०९ मध्ये वडले, ता. फलटण येथील रविंद्र लक्ष्मण सोनवलकर (वय ३१) या युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याची घटना घडलेली आहे, याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि. १२ मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल जीतच्या रूम नं. २०९ येथे रविंद्र लक्ष्मण सोनवलकर यांनी पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्येचे कारण समजु शकले नसले तरी सदरील युवकाने आत्महत्या करण्यापुर्वी सॉरी मित्रांनो म्हणुन मेसेज सेंड केलेले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार महेश बोडरे करित आहेत.


Back to top button
Don`t copy text!