भालवडी येथे जनावरांना लसीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

भालवडी येथे जनावरांवर उपचार करताना डॉ. मिलिंद बनसोडे.

स्थैर्य, म्हसवड, दि. ६ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचालित रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या अनुराधा शामराव बनसोडे मार्फत माण तालुक्यातील भालवडी येथे जनावरांन साठी मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन डॉ. मिलिंद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. बनसोडे यांनी जनावरांची तपासणी करून लसीकरण केले तसेच जनावरांच्या आजाराबद्दल व आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. या शिबिरास विषय  शिक्षक प्राध्यापक डी. डी. साळुंखे व प्राध्यापक डी. एस. मेटकरी  यांचे मार्गदर्शन लाभले. ही कृषी कन्या शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज जयसिंह मोहिते पाटील. डॉ. डी. पी कोरटकर. प्राचार्य आर. जी. नलावडे व प्राध्यापक एकतपुरे व प्राध्यापक एम. आर. अडत, यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सत्र पूर्ण करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!