
स्थैर्य, सातारा, दि. १३: सद्या 45 वर्षावरील नागरिकांचे की ज्याचा पहिला डोस देण्यात आला आहे. परंतु सद्य:स्थितीत जास्त प्रमाणात त्यांना दुसरा डोस देणे बाकी आहे. लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दि. 13 मे 2021 पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे कोविड-19 लसीकरण पुढील आदेश पर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचे शासनस्तरावरुन सुचित करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.