
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । फलटण । सध्या फलटण तालुक्यात जनावारांच्यामधील लंपी हा साथरोग फैलावत आहे. ह्या साथरोगाचा प्रादुर्भाव गावामध्ये वाढू नये म्हणून निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने निरगुडी गावामध्ये लंपीच्या बाबतीत प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले, अशी माहिती निरगुडीच्या सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते यांनी दिली.
निरगुडी गावामध्ये लंपीच्या बाबतीत प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले यावेळी सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सचिन सस्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक सस्ते, उपसरपंच सारिका बनसोडे, सदस्य शाहूराज सस्ते, दीपक मदने, वामन जाधव, दादासो सस्ते, धनंजय सस्ते, वैद्यकीय अधिकारी किरण देवकाते, सिद्धार्थ हार्डे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निरगुडी गावामधील ६५० जनावरांचे लसिकरण करण्यात आले.