दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील आंदरूड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील वाढता लंपीचा प्रादुर्भाव लक्षात घेता आंदरूडमध्ये लंपी रोगाचे निदान करण्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते.
पशूचिकित्सक डॉ. रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पाडण्यात आले. यावेळी आंदरूड गावचे सरपंच संपत कर्णे, उपसरपंच भागवतराव पाटील, फलटण मार्केट कमिटीचे अध्यक्ष शंभूराज पाटिल उपस्थित होते. तसेच धनाजी राऊत, जोतिराम वाघ, दिलीप आढाव, शेंडे मिस्त्री, जोतिराम कर्णे, बेलदार सर, अशोक राऊत व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. डॉ. गणेश अडसूळ व प्रा. नितिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत प्रशांत खोकले, अभिजीत भानवसे, समाधान चव्हाण, सुजित कन्हेरे, सुशांत खांडेकर, शंकर शिंदे आणि गणेश साबळे या कृषीदूतांनी लसीकरण शिबिर आयोजित केले होते.