वी फाउंडर सर्कलची ‘अवनी’मध्ये ७५ हजार यूएस डॉलर्सची गुंतवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २६: वी फाउंडर सर्कल (WFC) ह्या स्टार्ट अप गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्ट अप्सना सीड फंड देण्याच्या आपल्या उद्दिष्टाला पुढे सुरू ठेवताना मासिक पाळीशी संबंधित जागरूक व सर्वंकष देखभालीवर कार्य करणा-या अवनी ह्या स्टार्ट अपमध्ये ७५ हजार यूएस डॉलर्सची गुंतवणूक केली‌ आहे. ह्या ब्रँडद्वारे मासिक पाळीच्या देखभाली संदर्भातील विविध उत्पादने दिली जातात ज्यामध्ये पुन: वापरता येणारे अवनी कापडी पॅडस, अवनी सेंद्रीय कॉटन पॅड आणि अवनी मेन्स्ट्रुअल कप्स ह्यांचा समावेश आहे.

७५ हजार यूएस डॉलर्सच्या सीड राउंडमध्ये उद्योजक व गुंतवणूकदार असलेले अमित त्यागी, तंत्रज्ञान सेवा उद्योगामधील वरिष्ठ अधिकारी‌ असलेले, शिक्षण- तंत्रज्ञान, आरोग्य देखभाल व ग्राहक स्टार्टअपमधील गुंतवणूकदार असलेले श्रीकांत अय्यंगार अशा मुख्य गुंतवणूकदारांचा समावेश होता. अवनी उत्पादनाच्या विकासासाठी व उत्पादनाच्या लाईनच्या विस्तारासाठी ह्या निधींच्या वापराचे नियोजन केले आहे. विविध प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे जागरूकता वाढवण्यासाठीसुद्धा निधीमधील एक भाग विशेष प्रकारे वापरण्याचे अवनीचे नियोजन आहे.

वी फाउंडर सर्कलचे सह संस्थापक व सीईओ श्री. नीरज त्यागी म्हणाले , ‘२०२४ पर्यंत महिलांच्या स्वच्छता उत्पादनांचे मार्केट हे ५८.६२ अब्ज रूपये इतके वाढेल अशी अपेक्षा आहे. अवनीसारख्या नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सच्या सहभागासह नैसर्गिक पर्यायांची निवड करणा-या अनेक ग्राहक समोर येतील. ह्या प्रकारामध्ये अद्याप जास्त कोणी आलेले नाही आणि इथे इतकी स्पर्धा नाही. त्यामुळे इथे खूप मोठ्या संधी आहेत.’

अवनीच्या सह- संस्थापिका मिस. सुजाता पवार म्हणाल्या की, ‘आम्ही नैसर्गिक व पुन: वापरता येणा-या उत्पादनांचे पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामुळे महिलांना प्लास्टीक व रसायनांवर आधारित उत्पादने वापरण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. महिलांच्या उत्पादनांच्या बाजारपेठेमधील ८०% वाटा हा पॅडसच्या वर्चस्वाखाली असलेल्या स्थितीमध्ये आम्ही अँटीमायक्रोबायल पुन: वापरता येणारे व सेंद्रीय कॉटन सॅनिटरी पॅडसद्वारे सुरुवात केली. हळु हळु आम्ही मासिक पाळीशी संबंधित देखभालीच्या प्रकारातील विविध अन्य उत्पादने सुरू करणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही ५००० पेक्षा अधिक महिलांना सेवा दिली आहे.’


Back to top button
Don`t copy text!