
दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । सातारा । राज्य शासनाच्या महसूल विभागातील सेवानिवृत्त नायब तहसिलदार श्री. विनायक दत्तात्रय वारुंजीकर यांचे आज दि. १८ रोजी सकाळी ७ वाजता प्रतापगंज पेठेतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८८ होते. त्यांच्या मागे पत्नी शालिनी, एक मुलगी सौ. सुषमा, दोन मुले श्रीकांत (मत्स्यव्यवसाय अधिकारी) आणि श्रीनिवास (कवी, पत्रकार) आणि नातवंडे आहेत. जमिन कायदा तज्ञ अशी त्यांची ओळख होती. लिंब येथील श्री कृष्णाबाई उत्सव संस्थेच्या कार्यवाह पदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती.