दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । नवी दिल्ली । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
येथील कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात श्री.योगी आदित्यनाथ यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ‘श्री गणेशा’ची प्रतिमा श्रीमती पाटील यांना भेट दिली.