
दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । फलटण । विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गुरूवार दि. ५ मे रोजी सायं. ५ वा. सजाई गार्डन फलटण येथे जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह विविध कलाकारांचा हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना आदरांजली ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आपल्या आठवणीतून व मराठी हिंदी गीतांनी अर्पण करणार आहेत. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे (मुंबई), विभावरी आपटे (पुणे), अर्चना गोरे, सौरभ दप्तरदार, मनिषा लताड (पुणे) हे आपली गाणी सादर करणार आहेत.
या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, शिक्षणतज्ञ डॉ. मो. स. गोसावी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अमृतमहोत्सवा निमित्त ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सन्मान फलटणकर रसिकांच्या साक्षीने संपन्न होईल. कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेश पत्रिका आवश्यक आहे.
प्रवेशपत्रिकेसाठी संपर्क
विजय जाधव – 9823938182
हिरालाल गांधी – 9049604950
यांच्याशी संपर्क साधावा. अशी माहिती अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष अरुण भोईटे यांनी दिली आहे.