दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मॅट्रेसचा ब्रँड सेंच्युरी मॅट्रेसेस आता कॉपर-जेल तंत्रज्ञानाचा वापर केलेली पहिलीवाहिली गादी बाजारात उतरवण्यासाठी सज्ज झाला आहे. मॅट्रेसमध्ये कॉपर-जेल तंत्रज्ञान वापरण्यासाठी सेंच्युरीने अमेरिकास्थित प्रयोगशाळेच्या सहकार्यातून वर्षभरापेक्षाही जास्त काळ गहन संशोधन केले आहे. अमेरिकास्थित प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारतातील अव्वल ८ बाजारपेठांत ही संशोधन प्रक्रिया राबवण्यात आली. ग्रीन जेल तंत्रज्ञानातून कॉपर-जेल तंत्रज्ञानाकडे स्थलांतर करणारा पहिलाच ब्रँड म्हणून सेंच्युरीने भारताचा निद्रातज्ज्ञ असण्याच्या प्रतिबद्धतेप्रति आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे.
नवे कॉपर जेल तंत्रज्ञान मॅट्रेसच्या पृष्ठभागाच्या तुलनेत शरीरातील उष्णता घटवण्यासाठी लाभदायक ठरेल. यामुळे ग्राहकांना शांत आणि उत्तम झोपेचा अनुभव मिळू शकेल. कॉपर जेलमध्ये निसर्गत: दाहविरोधी गुणधर्म असतो. यामुळे शरीरावरील ताण कमी होण्यात मदत मिळते. या तीन अद्वितीय वैशिष्ट्यांसोबत सेंच्युरी मॅट्रेसेस आपल्या ग्राहकांना झोपण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळवून देण्याचे आश्वासन देत आहे.
तांबे हे नैसर्गिक आणि विषाणूरोधक प्रकृतीचे असते. शारिरीक सृदृढतेच्या दृष्टीकोनातून त्याचे मानवी आरोग्याला अनेकविध फायदेही होतात. थर्माजेलटीएम तंत्रज्ञान आणि तांब्यांचे विज्ञान यांच्या संयोगातून अतिशय आराम आणि दबावमुक्तीचा प्रत्यय येतो. हे नवे आणि सर्वोत्तम कॉपर-जेल तंत्रज्ञान आपल्या अजोड औष्मिक संवाहकतेच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वस्वी नवा अनुभव मिळवून देऊ शकते. ज्यात शरीर आणि मॅट्रेस यांच्यातील उष्णतेचे संतुलन साधले जाऊन विनाव्यत्यय झोपेचा आनंद घेता येईल.
सेंच्युरी मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक श्रीयुत उत्तम मालानी म्हणाले, आम्ही या तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासात एका वर्षापेक्षाही जास्त काळाची गुंतवणूक केली. अमेरिकास्थित एका प्रयोगशाळेने भारतातील सर्वोत्तम ८ बाजारपेठांत हे संशोधन राबवले. त्याच्या अतिशय गहन विश्लेषणातून मॅट्रेसमध्ये कॉपर जेल तंत्रज्ञान वापरण्याच्या आमच्या स्वप्नांची पूर्तता झाली. सतत नवसंशोधन करून त्याचा ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यावर आमचा विश्वास आहे. या उद्योगक्षेत्रात सर्वात प्रथम मॅट्रेसमध्ये कॉपर जेल तंत्रज्ञान आणत ग्राहकांना आणखी सुखकर आणि आरोग्यदायक निद्रा समाधान उपलब्ध करून देण्याचा कटिबद्धतेचा आम्ही पुनरूच्चार करत आहोत. जी सातत्याने विकासित होणाऱ्या ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत आहे. कॉपर जेल हे अभूतपूर्व तंत्रज्ञान ठरले आहे. ते या श्रेणीतील एक गुंतवणूकदार म्हणून आमची आघाडी प्रस्थपित करण्यासोबतच ग्राहकांच्या झोपण्याच्या अनुभवातही अमुलाग्र बदल घडवून आणणारे ठरेल.”
आपल्या नैसर्गिक आणि विषाणूरोधी गुणधर्मांमुळे तांबे वापरण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अभ्यास-संशोधनांतून सिद्ध झाले आहे की, तांबेयुक्त फोमचा वापर केल्यामुळे एस ऑरियस, ई कोली आणि मार्क्सियनससारख्या सूक्ष्मजीवांना पूर्णपणे प्रतिबंध झाला. अशा या गुणकारी धातूचा मॅट्रेसमध्ये वापर करून तंत्रज्ञानीय नवकल्पना आणि ग्राहकभिमुखतेत सेंच्युरी मॅट्रेसेसने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.