दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । सातारा । रासायनिक खतांच्या पिकांवरील अमर्याद वापरामुळे माणसांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे त्यामुळे आयुष्य कसे निरोगी ठेवावे आणि त्यासाठी आयुर्वेदाचा वापरच अतिशय चांगला असतो असे प्रतिपादन आयुर्वेदाच्या मार्गदर्शिका सौ पुनम चौगुले यांनी व्यक्त केले. सातारा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने *आयुर्वेदाचे आपल्या जीवनातील महत्त्व व त्याचा योग्य वापर कसा करावा* या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमात चौगुले या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव होत्या. सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या राजवाडा परिसरातील श्री.छ. थोरले प्रतापसिंह महाराज उद्यानातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर श्रीमती वैदेही देव तसेच सौ. सोनल कदम व सौ. दीपा देसाई या सौ. पुनम चौगुले यांच्या सहकारी उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील आयुर्वेद उपचार यावर सौ पुनम चौगुले यांनी अतिशय मौलिक असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. ज्येष्ठ नागरिकांना अतिशय उपयुक्त असा हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक खजिनदार मदनलाल देवी यांनी केले आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी यांनी आभार मानले यावेळी संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते गौतम भोसले तसेच महिला सभासदांची संख्या उपस्थितांमध्ये लक्षणीय होती.