
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। फलटण । विद्यार्थ्यांनी तीन वर्षे घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी, करियरसाठी उपयोग करून कर्तृत्व, नेतृत्व व स्पर्धेच्या युगात स्वतःचे स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयात वाणिज्य विभागाचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
वाणिज्य विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा.डॉ. सागर निकम , प्रा. देशमाने, प्रा. उमा निकम, प्रा. ललित वेळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सिद्धी कुंभार, रेणुका शिंदे, धनश्री भोसले, सुरज कुमकाले , देवदत्त कोळी, आदित्य ओव्हाळ , आदित्य बंडगर , रितेश मोहळकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मानसी कुंभार व संजना गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विशाल कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास 130 विद्यार्थी व 15 प्राध्यापक उपस्थित होते.