
दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२३ | फलटण |
खातगुण, ता. खटाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीरसाहेब राजे बागसवार यांचा दि. १५ मार्च ते १८ मार्च या कालावधीत उरूस साजरा होत आहे.
पालखी पूजन मा. श्री. प्रेम शहा लतीफ शेख ऑटोमॅक इंडस्ट्रीज, मु. पो. दहिगाव (नातेपुते), ता. माळशिरस, जि. सोलापूर व मा. श्री. प्रकाश धोंडीराम जगदाळे, मु. पो. चिंचाळे, ता.आटपाडी, जि. सांगली यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
उरूस कालावधीत बुधवार, दि. १५ मार्च रोजी चुना, गुरुवार, दि. १६ मार्च रोजी संदल, शुक्रवार, १७ मार्च रोजी जंगी उरूस व शनिवार, दि. १८ मार्च रोजी झेंडा व पालखी. मंगळवार, दि. २१ मार्च रोजी पाकळणी, असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
उरूसानिमित्त यात्रेकरूंच्या करमणुकीकरीता सिनेमा, तमाशे व इतर करमणुकीची साधने मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत.
यात्रेकरूंसाठी भरपूर पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून सदरच्या यात्रेला भाविकांनी व यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन श्री पीरसाहेब देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थ, खातगुण, ता. खटाव, जि. सातारा यांनी केले आहे.