दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू प्राथमिक शाळा, फलटण हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज फलटण येथे देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्जुन सास्तुरकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांचे परेड, कवायत प्रकार व भाषणे झाली. नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक हाजी नियाज अहमद कुरेशी यांच्या वतीने करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात फलटण शहरातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कुरेशी, हाजी सलीम कुरेशी, हाजी शकुर कुरेशी शकील आतार, मोहम्मद रफिक शेख (सर), तालिब कुरेशी, मोहम्मद कुरेशी, हाजी मुख्तार कुरेशी जाकीर भाई मणेर, सिकंदर डांगे, रियाज इनामदार, जमशेद पठाण, मुस्ताक भाई मेटकरी, अबिद खान, असलम मोदी, जमील कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किस्मत पटेल (सर) व आभार श्री. मुस्ताक शेख यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इम्रान नियाज अहमद कुरेशी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तांबोळी मॅडम, हायस्कूलचे प्राचार्य श्री. अक्रम मुल्ला (सर) सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.