साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ मार्च २०२४ | फलटण |
फलटण तहसील कार्यालयांतर्गत साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. महसूल शाखेच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यास मान्यता मिळाली आहे. हे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कार्यवाही सुरू झालेली आहे.

फलटण तालुक्याचा समावेश मोठ्या तालुक्यात होतो. फलटण तालुक्यातील प्रशासकीय कामाचा व भौगोलिक विस्तार पाहता कामकाजाचे सुसूत्रीकरण होण्यासाठी होळ, तरडगाव व आदर्की मंडलातील गावांचे फलटण शहरापासून असलेले अंतर लक्षात घेता नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय साखरवाडी येथे होणे गरजेचे होते, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रस्तावाद्वारे जिल्हाधिकारी व राज्याच्या महसूल खात्याकडे मांडले होते. तो प्रस्ताव महसूल शाखेच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे व त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे.

साखरवाडी अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरीता सध्याच्या मूळ फलटण तालुक्यातील होळ, तरडगाव, आदर्की बु. या मंडलातील गावे समाविष्ठ असणार आहेत.

वरीलप्रमाणे ३ मंडल, १९ सजे असून त्यामध्ये ४० गावांचा समावेश आहे.

साखरवाडी अप्पर तहसीलदार कार्यालयातील अप्पर तहसीलदार यांना ‘सुपरवायझरी अ‍ॅथोरिटी’ म्हणून उपविभागीय अधिकारी फलटण व ‘कंट्रोलिंग अ‍ॅथोरिटी’ म्हणून जिल्हाधिकारी सातारा हे काम पाहतील.


Back to top button
Don`t copy text!