‘क्लीअरटॅक्स फॉर हिरोज’चे अनावरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२३ । मुंबई । क्लीअरटॅक्स या भारतातील सर्वात लोकप्रिय आयटीआर फाइलिंग व्यासपीठाने आज संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी, शिक्षक व आरोग्यसेवा योद्धा यांना मानवंदना देणाऱ्या ‘क्लीअरटॅक्स फॉर हिरोज’चे अनावरण केले. त्यांच्या योगदानांचा सन्मान करत क्लीअरटॅक्सने आयटीआर प्लॅन्सवर फ्लॅट ५० टक्क्यांच्या सूटची घोषणा केली आहे, जी फक्त संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी, शिक्षक व आरोग्यसेवा योद्धा यांच्यासाठी उपलब्ध असेल.

खरे हिरो नेहमी कोणताही संकोच किंवा शंकेशिवाय इतरांच्या तुलनेत स्वत: पुढाकार घेतात. म्हणून त्यांचा सन्मान करण्याची वेळ आली आहे. अशा हिरोंवर अधिक जबाबादाऱ्या असल्याचे पाहता क्लीअरटॅक्सचा त्यांच्या मनातून कर भरण्याचा तणाव कमी करण्याचा मनसुबा आहे. या अद्वितीय मोहिमेच्या माध्यमातून हिरोंचा हा तणाव कमी करत त्यांना त्यांच्या बहुमूल्य कामावर अवधान केंद्रित करण्यास सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही मोहिम लिंक्डइन, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटवर व यूट्यूब अशा डिजिटल माध्यमांवर राबवण्यात येईल. ईमेल मार्केटिंग सारख्या ऑनलाइन क्रियाकलापांसाठी विविध फार्मा व एडटेक ब्रॅण्ड्ससोबत देखील सहयोग करण्यात आला आहे.

क्लीअरचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, “आम्ही आपल्या फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांच्या योगदानांची कदर करतो आणि त्यांना सन्मानित करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही आशा करतो की, या मोहिमेमुळे त्यांच्यावरील तणाव कमी होईल आणि मला खात्री आहे की, आमचा ई-फाइलिंग अनुभव त्यांना आनंदित करेल.”

क्लीअरटॅक्सवर कर भरण्याची प्रक्रिया १०० टक्के सुरक्षित व अचूक आहे. वापरकर्त्यांना त्यांची माहिती सुरक्षित असण्याची आणि त्यांच्या परताव्यांमध्ये कोणताही अडथळा न येण्याची खात्री मिळू शकते. त्यांचे स्वत:चे स्टॉक्स, क्रिप्टोकरन्सीज, ईएसओपी किंवा इतर कोणत्याही गुंतागूंतीच्या आर्थिक मालमत्ता असल्या तरी क्लीअरटॅक्स प्रक्रिया सुलभ करते, सुलभपणे कर भरण्याचा अनुभव देते. एका क्लिकवर करदाते प्री-फिल करू शकतात, भांडवली नफा आपोआप भरू शकतात आणि कंटाळवाणे कॅल्क्युलेशन्स आणि डेटा एंट्रीचा त्रास दूर करू शकतात, ज्यामुळे वेळ व प्रयत्नांची बचत होईल.


Back to top button
Don`t copy text!