दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२५ | फलटण | येथील गजानन चौकामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभूतपूर्व हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. स्वाती संदीप चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्वराज मानाच्या ओटीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. लकी ड्रॉ विजेत्या महिलांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या त्या महिलांच्या घरी जाऊन स्वराज मानाची ओटी देणार आहेत.