दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन/विस्तार अधिकारी संघटना/महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ पुरस्कृत अजिंक्य पॅनलचे अधिकृत उमेदवार सुनील विलास राजगुरू ग्रामसेवक पंचायत समिती खटाव यांची अनुसूचित जाती प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.
सातारा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था पंचवार्षीक निवडणुक २०२२ – २७ साठी खटाव तालुक्यामधुन श्री सुनिल विलास राजगुरू यांचे विरोधी उमेदवार श्री.हिम्मत गायकवाड (फलटण) श्रीमती मस्के (कराड) व श्री. कृष्णात माने (जावली) यांनी माघार घेतली. त्यामुळे खटाव तालुक्याचे उमेदवार श्री.सुनिल विलास राजगुरू यांची सातारा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पत संस्थेच्या संचालक पदी बिनावरोध निवड झाली आहे. यावेळी श्री.सुनील राजगुरू यांचा जिल्हा अध्यक्ष श्री.नंदकुमार फडतरे, जिल्हा सरचिटणीस श्री.अभिजीत चव्हाण, उपाध्यक्ष श्री.विजयराव निबाळकर, श्री.रमेश साळुंखे, श्री.डी. डी गायकवाड, खटावचे नेते श्री.बबनराव ढेबरे (दादा )पतसंस्था संचालक माजी व्हाईस चेअरमन नेते श्री.शशिकांत माने, तालुक्याचे युवा नेते संघटनेचे सचिव श्री.संदिप जगदाळे, पतसंस्था संचालक श्री.दिनेश काशीद, नेते श्री.महादेव आढाव, श्री.समिर शेख तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्याचे अध्यक्ष / सचिव,पदाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
सुनील विलास राजगुरू हे फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे रहिवासी असून कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय व ग्रामपंचायत व्यवस्थापनात कायमच पारदर्शक कारभार असणारे ग्रामसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण मी त्यांच्या अभिनंदन केले आहे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.