
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । दहिवडी । प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सातारा चे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे यांची सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके, चेअरमन राजेंद्र घोरपडे, सातारा जिल्हा संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व माजी चेअरमन,माजी संचालक, तसेच विद्यमान संचालक राजकुमार जाधव,भगवान धायगुडे, तुकाराम कदम,मोहन निकम,चंद्रकांत आखाडे,बंडोबा शिंदे,अनिल शिंदे,शंकर जांभळे,गणेश तोडकर,दत्तात्रय कोरडे,राजाराम खाडे,वैशाली जगताप, निर्मला बसागरे यांच्या सह माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व मार्गदर्शक तसेच पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्या सर्वांच्या अनमोल मार्गदर्शनाने व आशीर्वादाने सहकार क्षेत्रातील एका महत्वपूर्ण ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना लाभली आहे.