उन्नत व विश्वजित सांगळे यांची आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत घोडदौड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
पटाया (थायलँड) येथे १८ ते २२ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या आयटीएफ पटाया ओपनमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजित सांगळे या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा यांचा २-६, ६-४, १०-६ असा पराभव करत उपांत्यफेरीत मजल मारली. मात्र, उपांत्यफेरीत त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका या जोडीकडून ६-२, ६-० असा पराभव स्वीकारावा लागला.

मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो यांच्यावर ४-६, ६-२, ११-९ असा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जिथे त्यांना थायलँडच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला.

या स्पर्धेमध्ये वीसहून अधिक देश सहभागी झाले होते. ऑलिंपिक बीच गेममध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी उन्नत व विश्वजित सांगळे सहभागी होणार होते, पण या स्पर्धांचे आयोजन ऐनवेळी रद्द झाले. पण, पुढील आवृत्तीसाठी या आपल्या दोन्ही खेळाडूंची खेळातली कामगिरी यशस्वी वाटचालीकडे सुरू आहे. भारताच्या या जोडीच्या बीच टेनिस स्पर्धांमधील प्रदर्शनामुळे भारताची बीच टेनिस या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा होणार, हे निश्चित आहे.

उन्नत व विश्वजित सांगळे या दोघांची आई सौ. विजया सांगळे यांचे मूळ गाव फलटण आहे.


Back to top button
Don`t copy text!