स्थैर्य, वाई , दि.०५: शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर विनामास्क फिरणार्या, दुकानात सामाजिक अंतर न पाळणार्या दुकांनदारांवर आज प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदींनी शहरात व ग्रामीण भागात कारवाई करत 55 हजारापेक्षा जास्त दंड वसूल केला.काही दुकानदारांना सात दिवस दुकाने बंद करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर विनामास्क फिरणार्या, दुकानात सामाजिक अंतर न पाळणार्या दुकांनदारांवर प्रांताधिकारी, संगीता राजापूरकर चौगुले व तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर आदींनी टीमने वाई शहरात कारवाई करत आज पन्नास हजारापेक्षा तर भुईंज येथे पाच हजार पाचशे रुपये दंड वसूल केला. काही दुकानदारांना सात दिवस दुकाने बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वाई शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर रविवारी महसूल विभाग वाई, पोलीस विभाग वाई आणि पंचायत समिती वाई यांच्या एकत्रित पथकांनी वाई नगरपालिका हद्दीत आणि ग्रामीण भागात मास्क न घालणारे नागरिक त्याच प्रमाणे सामाजिक अंतर न पाळणारे दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये बावधन रोड येथील मधुरा गार्डन या कार्यालयावर मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांमध्ये धार्मिक कार्यक्रम घेतल्याने या कार्यालयावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे हे नियम पळून प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.