अनलॉक -5 : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथील होणार; सिनेमागृहांना मिळणार परवानगी? लवकरच जारी होऊ शकतात Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स


 

स्थैर्य, दि.२८: देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने हा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउनचे निर्बंध टप्प्या टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहे. सध्या सरकारने अनलॉक 4 अंतर्गत अनेक गोष्टींसाठी परवानगी दिलेली आहे. अर्थव्यवस्थेचा चालना देण्यासाठी काही निर्णय घेत उद्योग व्यवसाय सुरु करण्यास सूट दिली आहे. दरम्यान आता अनलॉक 5 अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरपासून भारतात अनेक सण उत्सवांना सुरूवात होत आहे. त्यामुळेच एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतानाच सरकार कोणत्या परवानग्या देते आणि कोणत्या गोष्टींवर निर्बंध कायम ठेवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्या महिन्यात गृह मंत्रालयाने आणखी काही सूट देण्याचे सांगितले होते. आता हळूहळू कंटेनमेंट झोनबाहेरील ठिकाणी सूट दिली जाणार आहे. आता, सणासुदीच्या दिवसात काही उद्योगांना तेजी येऊ शकते, त्यानुसार आणखी सूट दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सिनेमागृह हे बंद आहेत. यालाही 1 ऑक्टोबरपासून परवानगी केंद्र सरकार देणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी 21 सप्टेंबरपासून सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र यावर सरकारने माहिती दिलेली नव्हती. तसेच जलतरण तलाव, मनोरंजन पार्कला परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!