
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । कोरोनानंतरच्या काळामध्ये फलटण शहरासह तालुक्यामधील विविध हॉटेल व्यवसायिकांनी यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी फलटण तालुका हॉटेल असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. सदरील स्थापनेच्या मीटिंगमध्ये फलटण तालुक्यामधून अमर्यादित थाळी हद्दपार करण्याचा निर्णय सर्व हॉटेल व्यवसायिकांनी एक मुखाने घेतलेला आहे.
फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये फलटण तालुक्यामधील विविध हॉटेल व्यावसायिकांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी फलटण तालुका हॉटेल असोसिएशनची स्थापना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमिर शेख, योगेश भानुशाली, प्रभाकर पाटील, वैजनाथ नाळे, महेंद्र इंगळे, करण शिंदे, पोपटराव जगदाळे, अनिल राजे, श्यामराव धुमाळ, प्रवीण नाळे, प्रशांत सरगर यांच्यासह विविध हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
सदरील असोसिएशनच्या अध्यक्षपदी तेजसिंह भोसले, उपाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांची निवड करण्यात आली.
कोरोना काळामध्ये सर्व हॉटेल व्यवसाय हे पूर्णतः बंद होते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांनी मधील बऱ्याच मालक व चालकांचे हाल झालेले आहेत. याची नोंद घेऊन आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये दरवाढ करण्याचा निर्णय सुद्धा सदरील बैठकीमध्ये घेण्यात आला.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार होटेल ब्रह्माचे सर्वेसर्वा अभिजित भोसले यांनी केले.