कोळकीत रात्रीचे विनापरवाना ब्लास्टिंग?; ग्रामस्थ आक्रमक


दैनिक स्थैर्य | दि. 26 जुलै 2024 | फलटण | फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकीमध्ये जाधववाडी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकचे काम गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही वेळापूर्वी अचानकपणे रात्रीचे ब्लास्टिंग सुरू केल्यामुळे कोळकीमधील ग्रामस्थ हैराण झाले होते.

यावेळी कोळकी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी असणाऱ्या कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांना समज देण्यात आली. उद्यापासून ब्लास्टिंग किंवा रात्रीचे काम करण्यात येणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

ग्रामपंचायतीचे काम असले तरी ब्लास्टिंग साठी रीतसर परवानगी काढली होती का? व ब्लास्टिंग करत असताना नागरी वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग करण्याची परवानगी आहे का? असे सवाल कोळकी ग्रामस्थांच्या मनामध्ये उपस्थित राहिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!