पवारवाडीजवळ अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
पंढरपूर रोडवर पवारवाडी (विडणी, ता. फलटण) येथील बालवाडकर शेती फॉर्म येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकल (एमएच४२बीएच२३७८) वरील तानाजी रामचंद्र शिंदे (वय ५४, रा. टाकळवाडे, ता. फलटण) हे ठार झाले, तर त्यांची पत्नी राणी तानाजी शिंदे या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

अपघातातील शिंदे दाम्पत्य हे मोटारसायकलवरून फलटणहून टाकळवाडे येथे जात होते. या अपघात प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!