
स्थैर्य,सातारा, दि. 20: काशीळ (ता.सातारा) येथे झालेल्या चोरी प्रकरणात तीन अज्ञात इसमांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यानी एक दुकान फोडून १९,६०० रुपये लांबविले. ही घटना सोमवारी पहाटे घडली .तर बुधवारी नागठाणे (ता. सातारा) येथे चोरत्यांनी भर चौकातील दोन दुकानांचे शटर उचकटुन सुमारे 53 हजारांची रोकड़ लांबवली.सलग दोन दिवसाच्या अंतराने झालेल्या या चार घरफोडीतुन सुमारे 75 हजारांची लूट करण्यात आली.यामुळे बोरगांव पोलिसांपुढे चोरटयानी एक प्रकारे आव्हान निर्माण केले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील दिनकर माने यांचे काशीळ येथील बस स्थानकासमोर स्वीट मार्टचे दुकान आहे. तिथेच शेजारी त्यांचे चुलत बंधूंचे पान शॉप असून रात्रीचे वेळी पान शॉप मध्ये ते झोपण्यासाठी जातात.सोमवार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांचे चुलत बंधू यांना त्याचे स्वीट मार्टचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास मोबाईलवरून संपर्क साधून कल्पना दिली. त्यावेळी स्वप्नील माने हे बंधू दीपक माने यांच्यासोबत दुकानाजवळ आले असता दुकानाचे शटर उघडलेले दिसले. आतमध्ये साहित्यासहित रोख रकमेची पाहणी केली असता चोरट्यांनी सुमारे १९,६०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.याबाबतची फिर्याद स्वप्नील माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.तर नागठाणे येथे नागठाणे ते सासपडे रोडलगत वर्दळीच्या ठिकाणी आपला बझार व त्रिमूर्ती गिफ्ट शॉपी तसेच अन्य दुकाने आहेत. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी प्रथम आपला बझार या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.यावेळी त्यांनी कँश काउंटरमधील रोख 53 हजार रुपयांची रोकड लांबवली. त्यानंत त्यांनी आपला मोर्चा शेजारील त्रिमूर्ती गिफ्ट शॉपीकडे वळवला.प्रथम त्यांनी पुढचे शटर उचकटले.मात्र या ठिकाणी शॉपीचे संपूर्ण डिस्प्ले काउंटर असल्याने त्यांना आत जाता आले नाही.त्यानंतर त्यांनी बोळातील या शॉपीचे दुसरे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केला.मात्र तेथेही तसेच काउंटर असल्याने चोरटे तेथून निघून गेले.
सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी याची कल्पना बोरगाव पोलीसांना दिली.सपोनि डॉ.सागर वाघ यांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण केले.सोमवारी पहाटे काशीळ येथील मुख्य बाजारपेठेतही अश्याच प्रकारे अज्ञात चोरट्यानी दुकाने फोडली होती.तेथूनही त्यावेळी १९,६०० रुपयांची रोकड लांबवली होती.लगेचच नागठाणे येथील मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोरगाव पोलिसांसमोर या चोरट्याना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.या घटनेची फिर्याद आपला बझारचे मॅनेजर बाबासो जयसिंग पाटील ( रा.खानापूर,ता.वाळवा.जि. सांगली,सध्या रा.नागठाणे, ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

