स्थैर्य, वाई, दि.३१ : वाई मांढरदेव रस्त्यावर मांढरदेव गावच्या हद्दीत काळूबाईच्या जाळीलगत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर युवकाचा अज्ञात व्यक्तींनी खून क रून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडक ीस आले. संदीप शांताराम कदम (वय 36, मूळ गाव निघावणी, पो. पालवणी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, हल्ली रा. कल्याण)च असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मांढरदेव येथील काळुबाईच्या जाळी लगत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. गावापासून पासून एक किलोमीटर अंतरावर असणार्या दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. वाई पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस पाटलांनी खबर दिल्यामुळे आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी सर्वत्र कळवल्यानंतर संदीप कदमची पत्नी व नातेवाईकांनी वाई येथे येऊन मृतदेह ओळखला.
सदरचा इसम टॅक्सीचालक असून खाजगी भाडे व ओला कंपनीची भाडे करतात. 20 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तो कळंबोली ते कोल्हापूर भाडे घेऊन गेला होता. 21 डिसेंबरला दुपारी 2 वाजता त्याचे पत्नीशी बोलणे झाले. त्यावेळी त्याने कोल्हापूर येथे असल्याचे सांगितले. त्या रात्री 9.30 वाजेपर्यंत त्याचा संपर्क होत होता. परंतु, 22 डिसेंबर पासून त्याचा संपर्क नातेवाईकांना होऊ शकला नाही. त्यामुळे 24 डिसेंबरला कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप कदम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. त्यानंतर नातेवाईकांकडे शोध घेतला तरी ते सापडले नाहीत. मंगळवार (दि 29) रोजी मांढरदेव गावच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाबाबत पत्नी संजना संदीप कदम यांना कल्याण पोलिसांनी माहिती दिली. यानंतर संजना क दम यांनी दिर व पतीच्या मित्रासोबत वाईला येऊन मृतदेह पहिला असता तो संदीप शांताराम कदम यांचा असल्याचे उघडकीस आले. त्याप्रमाणे वाई पोलीस ठाण्यात संजना कदम यांनी अज्ञात व्यक्तींनी पतीचे अपहरण करून अज्ञात हत्याराने व क ारणासाठी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मांढरदेव येथील दरीत फेकल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली. त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी तपास केला. हवालदार शिवाजी वायदंडे, विजय शिर्के, प्रशांत शिंदे कृष्णराज पवार यांनी सहायय केले.