विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । मुंबई । डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.  अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीविद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेविद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेडॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!