परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे सुलभ


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई । जगभरातील सध्याची कोविड-19 ची प्रचलित स्थिती आणि कोविड-19 लसीकरणामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेऊन परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिक सुलभ केली आहेत.

भारतीय प्रमाण वेळेनुसार 20 जुलै 2023 च्या मध्यरात्रीपासून (रात्री 12.00 वाजता) नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे होते. आता या चाचणीची आवश्यकता  राहणार नाही.

तथापि, कोविड-19 च्या संदर्भात एअरलाइन्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळण्याच्या सावधगिरीच्या उपाययोजना पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 स्थितीकडे निरंतर लक्ष ठेवून आहे.


Back to top button
Don`t copy text!