केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विनायक मेटे यांच्या स्मृतिस्थळास भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । बीड । मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाची गरज असून त्यास आपला पाठिंबा आहे. अशा गरीब वर्गासाठी आरक्षण दिले जावे यासाठी स्व. विनायक मेटे यांनी मोठा संघर्ष उभारला होता. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या त्यांच्या संघर्षातून समाजातील तरुणाईची मोठी ताकद उभी राहिली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज बीड जिल्हा दौर्‍यावर आले होते. स्व.विनायकराव मेटे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम स्थळी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंतीदिन कार्यक्रम प्रसंगी स्व. विनायक मेटे यांच्या स्मृती स्थळास भेट देऊन त्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पप्पू कागदे, शिवसंग्रामच्या डॉ.ज्योतीताई मेटे, आशुतोष मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!