केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट


स्थैर्य, 19 फेब्रुवारी, सातारा :  युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गुरुवार दि. 19 रोजी जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यावेळी साताऱ्यामध्ये इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तसेच धनुर्विद्या या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असून sports authority of India च्या माध्यमातून पात्र प्रशिक्षकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील प्रतिभावान स्थानिक प्रशिक्षकांना सक्षम प्रशिक्षण व संधी देऊन क्रीडा सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबतही सकारात्मक विचारमंथन झाले. साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!