दैनिक स्थैर्य | दि. 29 डिसेंबर 2023 | फलटण | देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या फलटण दौऱ्यावर येणार असून उद्या शनिवार, दि. 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये भाग घेणार आहेत. त्यानंतर ठीक दुपारी 1 वाजता कोळकी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते दहिवडी कडे मार्गस्थ होणार आहेत.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे रविवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता सुरवडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व सुपर वॉरियर्सची बैठक सुरवडी येथील हॉटेल जॅक्सन इन्स येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. बैठक झाल्यानंतर ते पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत.